BREAKING बातमी.! दहावीचा निकालाची तारीख जाहीर, दुपारी 1 वाजता निकाल...
![BREAKING बातमी.! दहावीचा निकालाची तारीख जाहीर, दुपारी 1 वाजता निकाल...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6651a1b5212b8.jpg)
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं बारावीचा निकाल दि. 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर; आता बारावी'नंतर दहावीचा निकालही जाहीर केला आहे. १० वीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. आता दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातूनदेखील तुम्ही हा निकाल पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1 मार्च ते 6 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.