जऊळके दिंडोरी शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मूल्यांकन...
![जऊळके दिंडोरी शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मूल्यांकन...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65e01bcba5f6b.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मूल्यांकन झाले असून या स्पर्धेत शासकीय गटातील ८ शाळा अंतिम मूल्यांकन साठी निवडल्या आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन गटात होत आहे,पहिल्या गटात शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था च्या शाळा सहभागी असून दुसऱ्या गटात खासगी व्यवस्थापन च्या शाळा सहभागी झालेल्या आहेत. केंद्रास्तर मूल्यांकन करण्यात आले,त्यातुन तालुका स्पर्धे साठी शाळा निश्चित करण्यात आल्या. शासकीय गटातून जऊळके दिंडोरी जिल्हा परिषद शाळा अव्वल ठरली,द्वितीय जिल्हा परिषद वाघाड,तृतीय शासकीय आश्रम पिंपरखेड शाळेची निवड झाली.
खासगी व्यवस्थापन गटातून ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल प्रथम,के आर टी विद्यालय मोहाडी द्वितीय, जनता विद्यालय करंजवन तृतीय नंबर निवड झाली आहे. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक साठी ३ लाख,द्वितीय क्रमांक २ लाख तर तृतीय क्रमांक साठी १ लाख रक्कम पारितोषिक स्वरूपात दिली जाणार आहे.जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी जऊळके दिंडोरी शाळेची निवड होऊन जिल्हास्तरीय समितीने शाळेचे मूल्यांकन केले त्यात जिल्हास्तरावर जऊळके शाळा अव्वल ठरली.जिल्हास्तरावर प्रथम शाळेस ११ लाख,द्वितीय शाळेस ५ लाख तृतीय शाळेस ३ लाख रुपये रक्कम पारितोषिक स्वरूपात निवड झालेल्या शाळांना दिली जाणार आहे.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी जऊळके शाळेचे विभागस्तरीय समितीने मूल्यांकन करून राज्यस्तर स्पर्धेसाठी जऊळके शाळा अंतिम करण्यात आली. विभागस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१ लाख,द्वितीय ११ लाख,तृतीय ७ लाख रुपये निवड झालेल्या शाळांना दिले जाणार आहे. जऊळके शाळेस तालुका स्तरिय ३ लाख,जिल्हास्तरावर ११ लाख,विभाग स्तरिय साठी २१ लाख,रुपये असे एकूण ३५ लाख रकमेचे दावेदार ठरले आहे,राज्य स्तरावरील निकाल बाकी असून त्यातही शाळा निवडली तर शाळेची लॉटरी लागनार आहे. स्पर्धा १०० गुणांची असून स्वच्छ व सुंदर शाळा या बाबी वर भर देऊन मूल्यांकन करण्यात येत आहे.
या मध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ व शालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेची व संरक्षण भिंती ची रंग रंगोटी सजावट,वृक्ष रोपण,प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणीची शाळेची बचत बँक,मेरी माती मेरा,देश अभियानात शाळेचा सहभाग शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थिती प्रमाण,स्वच्छता मॉनिटर उपक्रम सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आयोजन,शालेय आरोग्य तपासणी, प्रथमोपचार पेटी,हँडवॉश स्टेशन,व्यवसाय व आरोग्य मार्गदर्शन,लोक सहभागातून शाळेचा विकास,प्लॅस्टिक मुक्त शाळा,तंबाखू मुक्त शाळा यासह विविध बाबींचे अवलोकन करण्यात आले आहे. जऊळके शाळेत सुसज्ज संगणक प्रयोगशाळा,नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा,वनौषधी गार्डन,सेमी इंग्रजी अध्यापन अशा विविध नाविन्यपूर्ण बाबी दिसून येतात.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, निलेश पाटोळे,सुनील दराडे, गटशिक्षणाधिकारी सी.बी. गवळी विस्तार अधिकारी सुनीता आहिरे,कैलास पगार,वंदना चव्हाण,केंद्रप्रमुख चंद्रकांत पवार आदींचे मार्गदर्शन लाभले. अभियान यशस्वीते साठी सरपंच भारतीताई जोंधळे, उपसरपंच तुकाराम भाऊ जोंधळे, मुख्याध्यापिका संगिता,जोपळे किरण कापसे,कमला देवरे,कल्याणी वाशिकर,उत्तम भोये,हरिभाऊ बच्छाव, सुप्रिया धोंडगे, नरेंद्र सोनवणे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले.