बाल आनंद मेळावा.! केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आठवडे बाजार उत्साहात संपन्न...

बाल आनंद मेळावा.! केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आठवडे बाजार उत्साहात संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - प्रविण  मखरे, सोलापूर

करमाळा तालुका केम  येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी'च्या विद्यार्थ्यांनी; आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. त्याला पालक व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नुतन माध्यमीक विद्यालयातील शिक्षक विजय वनवे यांनी सांगितले की, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत आठवडे बाजार व खाऊ गल्लीचे आयोजित करण्यात आले आहे. या आठवडी बाजारात विविध खाद्यपदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील शिक्षक, पालक, युवक कार्यकर्त्यांनी बाजारासाठी भाजीपाला जमा केला होता. यात सुमारे ४० ते ५० हजार रुपयाची उलाढाल झाल्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला. या आनंद बाजाराच्या माध्यमातून नफा - तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वकमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार मिळावे, श्रमाचे महत्त्व समजावे तसेच विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीस भर पडावी; या उद्देशाने बाजाराचे आयोजन केल्याचे सांगितले.

या उपक्रमाचे व्यवस्थापक शिक्षक विजय वनवे, पाटील सर, अवताडे सर, देवकर सर इत्यादि शिक्षक वर्गाने आणि शिपाई वर्गाने व विद्यार्थ्यांनी  हा आनंद बाजार यशस्वीरित्या उत्साहात पार पाडला आहे. विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य, नम्रता, संभाषण, आत्मविश्वास, गणनक्रिया, धीटपणा आदी गुणांचा विकास व्हावा तसेच संतुलित आहाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी हा आठवडे बाजार भरवण्यात आला होता.