जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा मुखेड येथे हळदीकुंकू व आनंद बाजार कार्यक्रम संपन्न...

जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा मुखेड येथे हळदीकुंकू व आनंद बाजार कार्यक्रम संपन्न...

प्रतिनिधी - अनंतोजी कालिदास, नांदेड़

जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा मुखेड येथे हळदीकुंकू व आनंद बाजार कार्यक्रम संपन्न.! या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ह. भ. प. नामदेव महाराज दापकेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, डॉ. सौ.आरती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी शाळेच्यावतीने आलेल्या प्रमुख पाहुण्याचा सन्मान केल्यानंतर आनंद बाजार व हळदी कुंकू कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली .

यावेळी या आनंद बाजारात लहान मुलांनी खाद्यपदार्थाच्या विक्रीची दुकाने थाटून झालेल्या व्यवसायातून मोठा नफा कमवण्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यावेळी या कार्यक्रमाला निमंत्रित मान्यवर विद्यार्थी पालक पत्रकार व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.