ZP शाळेतील त्या शिक्षकाची, शिक्षणमंत्र्यांकडे करणार तक्रार - सोमनाथ वतार
![ZP शाळेतील त्या शिक्षकाची, शिक्षणमंत्र्यांकडे करणार तक्रार - सोमनाथ वतार](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_646dc810da2de.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने; स्वतः वरील चौकशी बंद करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे बनावट सहिचं पत्र दिले असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या तक्रारीची अवघ्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. या चुकीच्या पध्दतीला आवर घालण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या शिक्षकाची बदली प्रकरणात बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपावरून चौकशी चालू होती अशी चर्चा आहे. तेव्हा या शिक्षकाचे मागील प्रकरणाचीही चौकशी व्हावी अशी मागणी यानिमित्ताने केलीय; तसेच याविषयी शिक्षण मंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ वतार यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या प्रतापाने अवघ्या जिल्ह्यात खळबळ उडाली. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक प्रमोद शिरसाठ असे या शिक्षकाचे नाव असल्याचे चौकशीअंती कळते.सदर शिक्षक हा संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे.संघटनेच्या पदाधिकारी म्हणून काम करत असतांनाच आपण उपशिक्षक म्हणून काम करतो याचा विसर यांना पडला आहे की काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.संघटनेत काम करत असताना शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरते.परंतु स्वतः च्या हितासाठी त्याचा वापर कोणी करत असेल तर ते कितपत योग्य असेल हा देखील एक चर्चेचा विषय ठरू शकतो. संघटनेचा पदाधिकारी म्हणून वावरताना गावातील राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत असल्याची तक्रारही याआधी वरिष्ठांपर्यंत पोहचल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीकडून कळते. शाळेत शिक्षक म्हणून वावरताना विद्यार्थ्यांचे हित बघणे आवश्यक असतांना स्थानिक राजकारणात संबंधित शिक्षकाचा रस असणे कितपत योग्य आहे? हा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.याआधीही विद्यार्थ्यांनीला प्रवेश नाकारल्याच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समितीने तक्रार केली होती. त्यानंतर अवघ्या जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्याची प्रशासनाने चौकशीही केली परंतु त्या चौकशीत काही गौडबंगाल तर झाला नसेल ना? अशी शंकाही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. संबंधित शिक्षक प्रमोद शिरसाठ यांच्या विरोधात शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत दाद मागणार असल्याचे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ वतार यांनी केले आहे.
1) बनावट कागदपत्र तयार करुन चौकशी थांबवण्याचा प्रकार नक्कीच निंदणीय आहे.झालेल्या प्रकारात शिक्षण विभाग आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. चुकीला शासन झालेच पाहिजे. त्यामुळे संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी या प्रकरणाची त्वरीत चौकशी करावी आणि दोषीवर कायदेशिर कडक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावात केराची टोपली दाखवण्याचा प्रकार यापुढे घडणार नाही,याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी.
रामदास चारोस्कर - माजी आमदार दिंडोरी
2) बनावट कागदपत्र तयार करुन चौकशीपासून सुटका मिळवुन घेण्याचा हा नवीनच प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अतिशय निंदणीय असून शिक्षण विभागाला ही अशोभणीय आहे. शिक्षण विभागाने चौकशी थांबवतांना त्या पत्राची रितसर शहानिशा करुन त्या पत्राला चौकशी थांबवण्याचा अधिकार आहे का? हा देखील विचार करायला हवा होता.! परंतू तसे झाले नाही. तरी शिक्षण विभागाने यातील दोषींला समोर आणून त्यांच्यावर कायदेशिर कडक कारवाई करावी. जेणेकरुन पुन्हा असे कृत्य कुठे घडणार नाही.
प्रवीण जाधव - संचालक मविप्र संस्था नाशिक
3) संबंधित प्रकार हा गंभीर असून याची सखोल चौकशी केली जाईल. दिंडोरीचे गटशिक्षणधिकारी यांच्याकडे या घटनेची संपूर्ण माहिती घेवून लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही केली जाईल.
भगवान फुलारी - शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. नाशिक