महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक तर, दुसर्‍या गुन्ह्यात घातक अग्निशस्त्र घेऊन फिरणा-या सराईत गुन्हेगारास अटक त्यांच्याकडुन एक पिस्टल व जिवंत काडतुस जप्त…!

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  मोटारसायकल चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक तर, दुसर्‍या गुन्ह्यात घातक अग्निशस्त्र घेऊन फिरणा-या सराईत गुन्हेगारास अटक त्यांच्याकडुन एक पिस्टल व  जिवंत काडतुस जप्त…!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : पिंपरी चिंचवड परिसरात व चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील मोटार सायकल चोरीवर आळा घालण्यासाठी गुन्हयांचे क्राईम मॅपिंग करुन, नाकाबंदी व पेट्रोलिंग करुन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे दिले होते. त्यांच्या आदेशावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी गुन्हे तपास पथक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत  व क्राईम मॅपिंग करुन पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठाकडून मिळालेल्या आदेशानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तपास पथकातील सर्व अंमलदारांनी वारंवार चोरी होणा-या ठिकाणांना भेटी देवुन मोटार सायकल चोरी गुन्हे घडलेली तारीख, वेळ, ठिकाण याची सखोल पडताळणी करुन गुन्हयांचे क्राईम मॅपिंग तयार करण्यात आले. त्यानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली.

२१ मे २०२३ रोजी पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने  इंडोरंन्स चौक येथे नाकाबंदी लावली असता सदर नाकाबंदी दरम्यान एक संशयित व्यक्ती मोटारसायकल नंबर एम.एच-१३ एस.व्हि ०६८६ या गाडी वरती आला. त्यास महाळुंगे पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळुन जावुन लागला. पळालेल्या व्यक्तीचा पाठलाग करुन त्यांला ताब्यात घेवुन त्यांच्या जवळ असलेली  हिरो कंपनीची स्प्लेंडर नंबर एम.एच-१३ एस.व्ही ०६८६ गाडी  बाबत विचारणा केली असता त्यांने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर त्याची कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरची गाडी ही १७ मे २०२३ रोजी महींद्र कंपनी गेट नं चे बाहेरील मोकळया जागेतुन  निघेाजे ता. खेड जि.पुणे येथुन चोरली असल्याचे सांगितले. त्याच्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अभिलेख तपासला असता सदरची मोटार सायकल चोरीबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६८/२०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपीस नाव गाव विचारले असता  चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप(वय ३६ वर्षे) रा. मुळगाव - चिंचवडगाव ता. वडवणी जि. बीड स.रा. - इंद्रायणी घाट परिसर, आळंदी, ता. खेड जि. पुणे असे सांगितले. त्यास सदर गुन्हामध्ये टक करण्यात आली आहे. वरील आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे अधीक तपास केला असता त्याच्याकडुन अजून ०६ गाडया जप्त केल्या आहेत.

 

त्यांचा तपशील खालीलप्रमाणे:  

अ.क्र.. पोलीस ठाणे   गु.र.नं. व कलम    चोरीस गेलेला माल     किंमत

१)  महाळुंगे पोलीस चौकी २६८/२०२३ भादवि क ३७९ एम एच १३ एस व्ही ०६८६  ३५,०००/-

२) महाळुंगे पोलीस चौकी १८३/२०२३भादवि क ३७९ एम एच १४ जे डी ६०४०  ४५,००० /-

३) महाळुंगे पोलीस चौकी २१४/२०२३भादवि क. ३७९, एम एच १४ एच एन ३५६१. ४०,०००/-

४) आळंदी पोलीस स्टेशन १३५/२०२३भादवि क. ३७९ एम एच १४  ए एक्स २४५५,  २०,०००/-

५) भोसरी एमआयडीसी पोलीस पोलीस स्टेशन २१५/२०२३ भादवि क. ३७९ एम एच १२ जे आर ७०१६ १५,०००/-

६) जेजुरी पोलीस स्टेशन १९१/२०२३ भादवि क. ३७९ एम एच १२ टी बी ८७६५, ३०,०००/

७) हवेली पोलीस स्टेशन १५२/२०२३ भादवि क. ३७९  एम एच ०९ जी जी ८४६३, ,२५,०००

एकुण मोटार सायकली जप्त किंमत   - ,१०,०००/- रुपये 

मोटार सायकल चोरी करणारे अटक पुरुष आरोपीचे नाव व त्याच्यावर दाखल गुन्हे : –

चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप, वय ३६ वर्षे, रा. मुळगाव - चिंचवडगाव ता. वडवणी जि. बीड सध्याचा पत्ता - इंद्रायणी घाट परिसर, आळंदी, ता. खेड जि. पुणे 

दाखल गुन्हे

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नंबर व कलम

१) वडवणी, बीड ८०/२०१८भादवि कलम ३७९,३४

२) शिवाजीनगर बीड १७८/२०२१ भादवि कलम ३७९

३) माजलगाव बीड  ३०५/२०२० भादवि कलम ३७९

४)आंबेजोगाई शहर बीड २३६/२०२१ भादवि कलम ३७९

५) बीड शहर  १२१/२०२२ भादवि कलम ३७९

६) शिवाजीनगर बी १४८/२०२२ भादवि कलम ३७९

७) कोतवाली अहमदनगर ४७६/२०२१ भादवि कलम ३७९

८) बीड ग्रामीण १०७/२०१९ भादवि कलम ३७९

९) पनवेल तालुका ६५/२०१७ भादवि कलम ३८०,४५४,४५७

१०) वडवणी बीड १४०/२०२१ भादवि कलम ३७९

११) बीड शहर  ४४/२०१९ भादवि कलम ३७९

१२)वाकड पिंपरी चिंचवड ३०१/२०२२ भादवि कलम ३७९

१३) वाकड पिंपरी चिंचवड २८३/२०२२ भादवि कलम ३७९

१४) वाकड पिंपरी चिंचवड ३११/२०२१ भादवि कलम ३७९

१५) चाकण पिंपरी चिंचवड ५६६/२०२२ भादवि कलम ३७९

तरी चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील कामगारांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसाकडून आवाहन करण्यात येते की, सर्वजन मोटारसायकल वापरत असताना हेलमेटचा वापर करावा तसेच कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत सिक्युरिटी / सीसीटीव्हीच्या निगराणीखाली लावण्यात याव्यात. मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे व हॅन्डल लॉक करुन पार्क कराव्यात जेणेकरुन कंपनी आवारामधुन होणा-या चोरीस प्रतिबंध घालता येईल.

तर दुसर्‍या एका गुन्ह्यात २३ मे २०२३  रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना गुप्त माहितीच्या आधारे बातमी मिळाली की, आकाश अण्णा भोकसे(वय २३ वर्षे) रा. मौजे कुंरकुंडी ता. खेड जि. पुणे हा पिस्टल घेऊन कॉर्निंग कंपनी कोरेगाव ता. खेड जि. पुणे जवळ येणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. त्यानंतर महाळुंगे एमआयडिसी हद्दीतील कॉर्निंग कंपनी कोरेगाव ता. खेड जि. पुणे जवळ  सापळा लावला असता सदर ठिकाणी आकाश अण्णा भोकसे हा येताच त्याला पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी व तपास पथकातील अंमलदारानी तो पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असताना त्यास शिताफीने पकडले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबंरेला एक पिस्टल व पॅन्टच्या खिशात एक जिवंत काडतुस मिळुन आले. सदर व्यक्तिला त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश आण्णा भोकसे असे असल्याचे सांगीतले. सदर व्यक्तिला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन एक देशी बनावटीचे  पिस्टल व एक जिवंत पिंतळी काडतुस जप्त करण्यात आले.  त्याचे वर्णन खालीलप्रमाणे: –

)  २५,०००/- रु.किंमतीचे एक देशी बनावटीचे स्टिल धातुचे पिस्तुल,त्याचे स्ट्रिगरवर ट्रिगर गार्ड, त्यास काळया रंगाची फायबरची ग्रिप असलेले, मॅक्झीन सह जु.वा.किं.अं.         

)   ५००/- रुपये किंमतीचे एक पितळी धातुचे जिवंत काडतुस किं.अं. २५,५०० /- येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे एक पिस्तुल व एक जिवंत पितळी काडतुस असा मुद्देमाल जप्त करुन  महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.न. २८१/२०२३ कलम आर्म अॅक्ट कलम (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७() १३५ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपीवर यापुर्वी दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे : – 

अ.क्र..     पोलीस ठाणे   गु.र.नं. व कलम     

१)  चाकण पोलीस स्टेशन ३३४/२०१७ भादवि क ३०२, आर्म अॅक्ट (२५), २७

२) खेड पोलीस स्टेशन ७११/२०२२ आर्म अॅक्ट कलम (२५)

सध्या महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उत्तम कामगिरी समोर येत आहे. वरील घडलेले दोनही गुन्हे अतिशय शिताफीने आणि तांत्रिक दृष्ट्या तपस करून अवघ्या दोन दिवसात तडीस लावले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी कार्यभार स्वीकारल्या पासून त्यांनी थेट जनतेत जाऊन गुन्हेगारी काशी रोखता येईल या दृष्टीने कामास सुरुवात केली आहे. कोणताही व्यक्ती आपल्याकडे न्याय मागायला आल्यानंतर त्याच्या संपूर्ण शंकेचे निरसन कसे करता येईल यासाठी थेट वरिष्ठ म्हणून वसंत बाबर यांनी स्वत:चा फोन नंबर सार्वजनिक केला आहे. याचा नक्कीच औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे सर्वत्र कामगिरी बद्दल कौतुक होत आहे.

  

वरील नमूद दोनही कारवाया पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटिल, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलिस हवालदार अमोल बोराटे, अशोक जायभाये युवराज बिराजदार, पोलिस नाईक संतोष काळे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, पोलिस नाईक जमदाडे, पोकॉ. शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, बाळकृष्ण पाटोळे, मोल माटे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, राहुल मिसाळ, शरद खैरे महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अशोक जायभाये हे करीत आहेत.