खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पुन्हा अटक.! २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी...

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पुन्हा अटक.! २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी...

प्रतिनिध विश्वनाथ केसवड पिंपरी चिंचवड.

पिंपरी चिंचवड, दि. २६ जून – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना २९ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२३ जून रोजी गुजरनगर, थेरगाव येथे फिर्यादीच्या भावावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात त्याचा हात पंजा व बोटांसह तुटून तो गंभीर जखमी झाला होता. आरोपींनी आम्ही इमले माई आहोत, आमचा कोणी नाद करू नये, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी रोहन सोपान निगळ, प्रसांत ऊर्फ बापू सकट, आणि शुभम पवार यांना २३ जून रोजी अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयात सादर करताना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ मधील तरतुदींची पूर्तता न झाल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. मात्र पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि. सुभाष चव्हाण यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २६ जून रोजी पुन्हा अटक केली. सरकारी वकील एपीपी व्ही.सी. गुरुळीकर यांच्या प्रभावी युक्तीवादामुळे न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली.

या कारवाईत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, आणि वाकड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास सपोनि. अनिरुद्ध सावर्डे करीत आहेत.