पुणे शिक्षण उपसंचालक विभागाच्या आर्थिक तडजोडी चव्हाट्यावर, शिक्षक उपसंचालक विभागातील महिला लेखाधिकार्यासह दोघांना एसीबी कडून अटक...!
![पुणे शिक्षण उपसंचालक विभागाच्या आर्थिक तडजोडी चव्हाट्यावर, शिक्षक उपसंचालक विभागातील महिला लेखाधिकार्यासह दोघांना एसीबी कडून अटक...!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63f48831dd29f.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
पुणे : वेतन आयोगानुसार वेतन निच्छितीची पडताळणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ महिला लेखाधिकारीसह दोघांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने छापा टाकून अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोडी करून होत्याचे नव्हते केले जात असल्याचे अनेक प्रकरणाच्या मधून समोर आले होते. ज्या विद्यालयांना मान्यता नाही अशा शिक्षकांचे पगार करणे, एखाद्या गंभीर गुन्ह्यात शिक्षक दोषी असतील तरीही त्यांचे आर्थिक तडजोडी करून पगार करणे, वेतन निच्छिती व सेवा पुस्तके अपुरे किवा त्यात त्रुटि असतांनाही टेबला खालून आर्थिक व्यवहार करून प्रकरणे निकाली काढणे असे एक ना अनेक कारनामे या विभागात सुरू असल्याचे मागील काही दिवसापासून सुरू असल्याचे निदर्शनास आले होते.
या कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी(वय-३८ वर्षे), कनिष्ट लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे(वय-५७ वर्षे) यांना सेवा पुस्तकावर सहाव्या आणि सातव्या आयोगानुसार वेतन निच्छिती पडताळणी करून हवी होती. पडताळणीसाठी प्रमिला गिरी यांनी सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे मान्य करून तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर लष्कर भागातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा रचून गिरी व लोंढे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे माध्यमिक शिक्षण विभागात अनेक प्रकारचे असे अनाकलनीय कारनामे होत असल्याचे समोर आले आहे. त्यात वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्या कार्यालयात शिक्षकांना दिवसभर ताटकाळात ठेवले जाते. एखादा शिक्षक पुणे शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असता हे प्रकरण माझ्याकडे नाही उपसंचालक यांच्याकडे आहे. अन उपसंचालक यांच्याकडे गेले असता मला तेच काम नाही तुम्ही आणि शिक्षणाधिकारी बघून घ्या असे उत्तर दिले जाते. मंत्र्यांच्या दालनात एवढा वेळ प्रतीक्षा करावी लागत नाही एवढा वेळ पुणे शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्या कार्यालयात प्रतीक्षा करावी लागते अशीही तक्रार अनेक शिक्षक, मुख्याध्यापक यांनी केली आहे.
पुणे विभाग माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांच्याही कारभाराची सखोल चौकशी मंत्री महोदय यांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षण विभागाला हे दोनही कार्यालय कीड असल्याची मोठी चर्चा आता पुणे जिल्हासह परिसरात रंगू लागली आहे.
या संदर्भात वेतन विभागाच्या अधीक्षक कविता शिंपी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला शिक्षणाधिकारी व उपसंचालक जे आदेश देतात त्यांनुसार आम्ही कार्यवाही करतो. आमचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाहीं असे सांगितले. जर तुमचा कालच्या कारवाई प्रकरणात काही संबंध नाहीं तर हे कर्मचारी कोणाच्या नियंत्रणात काम करतात हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावरून कुठे तरी कविता शिंपी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वरील कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गरुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास उपाधीक्षक विजयमाला पवार या करत आहेत.