शैक्षणिक : २६ जुलै २०२४ ला पुण्यातील घाट माथ्यावरील शाळांना सुट्टी जाहीर..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर,वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील घाट माथ्यावरील शाळा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका,अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे. असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. विशेष करून वरील नमूद तालुक्यात फक्त घाट माथ्यावरील शाळांनाच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी..