दिंडोरी महाविद्यालयात एका आठवड्याच्या सॉफ्ट स्कील्स डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन....!
News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण
नाशिक : दिंडोरी येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आज सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत द्वितीय आणि तृतीय वर्ष कला व वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्कील्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत एक आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन नाशिक येथील के.व्ही.एन.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेचे सदस्य डॉ.संजय सानप यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे,उपप्राचार्य डॉ.सुनिल उगले, प्रा.डॉ.रूपाली शिंदे, प्रा.तेजस्विता मुंडे,डॉ.संतोष भैलुमे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.राजेंद्र डोईफोडे यांनी सॉफ्ट स्कील्स डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रशिक्षण विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यामध्ये असणारे जीवन कौशल्य आणि त्यासाठी या प्रशिक्षणमध्ये मांडले जाणारे विषय व साधन व्यक्ती यांची पूर्ण आठवड्याची रुपरेषा सांगितली.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.संजय सानप यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्किल्स आत्मसात करून त्याचा उपयोग स्वतासाठी तसेच समाजासाठी केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध मूल्ये जोपासली पाहिजेत असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे यांनी सांगितले की,पूर्ण आठवडाभर होणाऱ्या सॉफ्ट स्कील्स डेव्हलपमेंट प्रशिक्षणात महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन वेगवेगळी विविध कौशल्ये प्राप्त करून विद्यार्थ्यानी येणाऱ्या स्पर्धेसाठी स्वतःला सिद्ध करावे.अशा कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विता मुंडे यांनी केले तर आभार डॉ.संतोष भैलुमे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी द्वितीय आणि तृतीय कला व वाणिज्य वर्गातील एकूण ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला आहे.