पोलाद स्टील कंपनीने घडविले विद्यार्थ्यांना आकाशगंगेचे दर्शन...

पोलाद स्टील कंपनीने घडविले विद्यार्थ्यांना आकाशगंगेचे दर्शन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी : संतोष कुलथे

जळगांव / बुलढाणा : जालना येथील पोलाद स्टील कंपनीने; बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव तालुक्यात असलेल्या सुनगाव येथे.! मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आकाशगंगा व आपली सुर्यमाला याचे प्रात्यक्षिकासह दर्शन घडविले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष डॉ. कुलदीपसिंह राजपूत हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये शाळेचे शिक्षक शिवदास सोळंके सर, घोटेकर मँडम, आढाव सर, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, फोलाने सर, पोलाद स्टीलचे एरिया मॅनेजर हिमांशु पवार, सहाय्यक अभियंता राजू शेळके, सुनगाव येथील आवजीसिद्ध  बिल्डिंगचे मटेरियल चे संचालक राजेश पाटील, उमेश कुरवाडे इत्यादी उपस्थिती होते.

मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे अध्यक्ष कुलदीपसिंह राजपूत यावेळी बोलतांना म्हणाले कि, असेच नावीन्यपूर्ण उपक्रम आमच्या विद्यालयात आम्ही राबवत राहु.! ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन होऊन अभ्यासाची गोडी निर्माण होईल. तसेच त्यांनी ह्या उपक्रमाबद्दल पोलाद स्टीलचे कंपनीचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षकांसह शिपाई विशाल वसूलकर यांनी परिश्रम घेतले.