महिलांना मिळाले सहउद्योगाचे धडे.! दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक...
![महिलांना मिळाले सहउद्योगाचे धडे.! दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65eed830c743e.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभवासाठी कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील विद्यालयाच्या कृषीकन्या यांनी दुधापासून बनवले जाणारे पदार्थ मूल्यवर्धन उत्पादने याविषयी माहिती देऊन व दुधापासून लस्सी, पनीर, बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया देखील महिलांना समजून सांगितल्या कमीतकमी भांडवलामध्ये हा गृहउद्योग कसा चालू करू शकतो याविषयी माहिती दिली.
यावेळी कृषीकन्या वैष्णवी धोंडगे, वेदिका घुगे, साक्षी हांडगे, दुर्गा जोंधळे, सृष्टी कदम, मृदुला केंग, संपदा जातक आदिसह सरपंच अश्विनी दोडके महिला उपस्थित होत्या. या कृषी कन्यांना संदीप देशमुख बि.डी. भाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.