माळरानावरील फुलांना खुप सुगंध आसतो - मा. मंत्री बाळासाहेब जाधव

माळरानावरील फुलांना खुप सुगंध आसतो - मा. मंत्री बाळासाहेब जाधव

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

ट्युशन व क्लासेस करून 12 वी'च्या परिक्षा देण्याऱ्या शहरातील मुलांमध्ये खुप गुणवत्ता नसते. परंतु ग्रामिण भागातील कनिष्ठ महविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते; महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय किनगाव येथे आयोजीत 12 वी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुण गौरव सोहळा प्रसंगी.! माजी मंत्री बाळ‌ासाहेब जाधव हे बोलत होते.

प्रास्ताविक प्रा. विष्णुदास पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव बोडके कार्याध्यक्ष छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था तथा उपसरपंच हे होते. प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब जाधव होते, प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ बी आर बोडके, प्राचार्य तथा सचिव  धनराजे बोडके, पर्यवेक्षक विष्णुदास पवार होते.

पुढे बोलताना माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, शहरातील फुलांच्या बागेला पाणी व खत दिले जाते परंतु माळरानावरील फुलांना फक्त नैसर्गिक पाणी मिळते त्या फुलांना खूप जास्त सुगंध असतो. बारावी विज्ञान शाखेतील तालुक्यातून व केंद्रातून प्रथम आलेल्या तुषार राजकुमार चाटे द्वितीय व तृतीय गुणवंत विद्यार्थी व कला शाखेतून केंद्रात प्रथम आलेल्या दिशा कलवले तसेच द्वितीय व तृतीय गुणवंत विद्यार्थी वाणिज्य शाखेतून प्रथम द्वितीय व तृतीय तसेच विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणी मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप विठ्ठलरावजी बोडके यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अभय गोरटे डॉ ज्ञानेश्वर मुळे प्रा बालाजी गुट्टे प्रा पद्मजा हगदळे प्रा लक्ष्मण क्षीरसागर प्रा विठ्ठल कबीर प्रा राजीव गुट्टे  प्रा राजकुमार शिंदे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दयानंद सूर्यवंशी यांनी केले.