लोहिया विद्यालयात वीर बाल दिवस साजरा...
![लोहिया विद्यालयात वीर बाल दिवस साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_676d5e6cb49ea.jpg)
प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया
सडक अर्जुनी - लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे.! आज दि. 26 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला विद्यालयात, संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने, प्राचार्या मा. उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे व सौ के.एस. काळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थित विद्यालयात वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांचे पुत्र विर साहिबजादा जोरावरसिंग व साहिबजादा फतेहसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. विद्यालयातील यु. एस. जुमड़े मॅडम यांनी वीर साहिबजादा जोरावरसिंग व साहिबजादा फतेहसिंग यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
या दिवसावर आधारित विद्यार्थ्यांच्या वर्ग ५ ते ७ कथाकथन, कविता वाचन , चित्रकला, वर्ग ८ ते १२ वादविवाद, निबंध, कविता वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. यु.बी. डोये यांनी केले तर आभार स.शि.एन.डी. अलोने यांनी मानले.