लष्कराचं वाहन दरीत कोसळल्याने.! महाराष्ट्राचे दोन वीरपुत्र (जवान) शहिद...

लष्कराचं वाहन दरीत कोसळल्याने.! महाराष्ट्राचे दोन वीरपुत्र (जवान) शहिद...

काश्मीरमधील पूंछ भागात लष्कराचं वाहन दरीत कोसळल्याने सातारा जिल्ह्यातील कामेरी गावाचे जवान शुभम समाधान घाडगे (२८) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अक्षय दिगंबर निकुरे (२७) या दोन्ही जवानांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जवान मृत्युमुखी पडले. पूंछ जिल्ह्यातील घारोआ भागातून वाहन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ते ३०० ते ३५० फूट दरीत कोसळले होते. या अपघातात १२ जवान जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून लष्कराचा तळ अवघ्या १३० मीटरवर आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या गाडीला मंगळवारी झालेल्या भयंकर अपघात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. साताऱ्यातील शुभम समाधान घाडगे (२८) आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान अक्षय निकुरे अशी या मृत जवानांची नावे आहेत.