दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती...
![दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_663f89e5c9c68.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा - लोकसभा निवडणूक २०२४ स्वीप SVEEP (मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (Systematic Voter's Education and Electoral Participation) बुधवार दि. ०८ मे २०२४ रोजी के.व्ही.एन.नाईक कॉलेज, दिंडोरी येथे मतदान करणे कामी दिंडोरी नगरपंचायततर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
तसेच गुरुवार दिनांक- ९ मे २०२४ रोजी हनुमान मंदिर,जुनी कोर्ट गल्ली, दिंडोरी येथे मतदान करणे कामी दिंडोरी नगरपंचायत तर्फे भजनी मंडळ कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले. शुक्रवार दिनांक- १० मे २०२४ रोजी कांदा मार्केट,उमराळे रोड,दिंडोरी येथे मतदान करणे कामी दिंडोरी नगरपंचायत तर्फे क्रीडा स्पर्धा - शर्यत,गोळा फेक मतदान जनजागृती,नागरीकांना आवाहन करिता घेण्यात आली.तसेच दिंडोरी शहारातील प्राथमिक आरोग्य केंद्र- आपला दवाखाना सिद्धार्थ नगर, निळवंडी रोड, दिंडोरी येथे शनिवार दिनांक - ११ मे २०२४ रोजी स्विप अंतर्गत दिंडोरी नगरपंचायत तर्फे आरोग्य शिबीर आयोजन करण्यात येऊन मतदान जनजागृती तसेच मतदान करणे कामी नागरिकांना आवाहन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मतदान करणे कामी नागरिकांना माहितीपत्रक वाटण्यात येत आहे.
येत्या लोकसभा निवडणूक -२०२४ मध्ये दिनांक- २० मे२०२४ रोजी १००% मतदान करा लोकशाही बळकट करा असे आवाहन दिंडोरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे.