दिंडोरीत निपुणोत्सव उत्साहात संपन्न.! स्टॉल स्पर्धेत प्रकाश महाले प्रथम

दिंडोरीत निपुणोत्सव उत्साहात संपन्न.! स्टॉल स्पर्धेत प्रकाश महाले प्रथम

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

जिल्हा परिषद नाशिक व दिंडोरी पंचायत समिती यांच्या वतीने निपुण भारत अभियान अंतर्गत   निपुणोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.नाविन्यपूर्ण स्टॉल सादरीकरण स्पर्धेत इंदोरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश महाले यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

करण्यात आले.दिंडोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा दिंडोरी क्रमांक -१ येथे निपूणोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विस्तार अधिकारी (शिक्षण) व गटसमन्वयक वंदना चव्हाण,सुनीता आहिरे,कैलास पगार व वनीमुली केंद्राचे केंद्रप्रमुख किसन पवार व  केंद्रप्रमुख उपस्थित होते. उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल कोथमीरे यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०  नुसार,पायाभूत स्तरातील( वयोगट वयवर्षे ३ ते ९) विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता  विकसित होण्यासाठी निपुणोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये

दिंडोरी तालुक्यातील सर्व १९ केंद्रांनी सहभाग घेतला.प्रत्येक केंद्रातून एक स्टॉल लावण्यात आला  व त्या स्टॉलचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक स्टॉल धारकांनी आपल्या कृतीचे उत्तम सादरीकरण केले उत्तम कृतीचे निरीक्षण तज्ञांनी केल्यानंतर  १ ते ३ नंबर  व दोन उत्तेजनार्थ नंबर काढण्यात आले. 

 प्रथम -प्रकाश केशव महाले ( जिल्हा परिषद शाळा इंदोरे)

 द्वितीय- पल्लवी हिरामण चौधरी  जिल्हा परिषद शाळा संगमनेर)

तृतीय- दुर्गा केशव वाघ ( जिल्हा परिषद शाळा चिल्हारपाडा )

उत्तेजनार्थ- गायत्री अंबादास राऊत( जिल्हा परिषद शाळा मोळविहीर) 

उत्तेजनार्थ- स्वप्नाली भास्कर बोरसे( जिल्हा परिषद शाळा जऊळके वणी).

उपरोक्त शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तसेच  सहभागी सर्व शिक्षकांना  देखील प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पालक, विद्यार्थी तसेच समग्र शिक्षाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार  वैशाली तरवारे यांनी मानले. निपुणोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंडोरी क्रमांक १ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोरसे, गटसाधन केंद्रातील प्रांजल कोथमिरे आरती डिंगोरे, रोहिणी परदेशी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, समाधान दाते, दीपक पाटील, रीना पवार, अश्विनी जाधव पौर्णिमा दीक्षित, कल्पना गवळी आदींनी परिश्रम घेतले.