दिंडोरी तालुक्यात उद्यापासून पोलिओचे लसीकरण...

दिंडोरी तालुक्यात उद्यापासून पोलिओचे लसीकरण...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यात उद्या रविवार दि.३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून दिंडोरी तालुक्याला पोलिओची लस देण्यासाठी ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.

दिंडोरी तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरीय बैठक डॉ. मांडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दिंडोरी  तालुक्यातील शहर व ग्रामीण भाग मिळून ३२ हजार ७९६ लाभार्थी बालकांना १० प्राथमिक आरोग्य केंद्रातून व ६७ उपकेंद्राच्या माध्यमातून २६९ केंद्रांवर लसीकरण केले जाणार असून ५१२ कर्मचारी त्याचबरोबर मोबाईल पथके,ट्राझिट टीम पथकाद्वारे वाडीवस्तीच्या ठिकाणी व जोखीमग्रस्त भागात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.मांडगे यांनी दिली.

याशिवाय लसीकरण दिल्यानंतर कार्यक्षेत्रात तीन दिवस सर्व घरांना प्रत्यक्ष भेट देऊन वंचित लाभार्थ्यांचे पोलिओ लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.सदर पल्स पोलिओ लसीकरण हे सकाळी ८ ते ५ या दरम्यान बूथवर होणार असून या पल्स पोलिओ लसीकरणाचा लसीकरण मोहिमेचा नागरिकांनी आपल्या बालकांना आपल्या जवळ असणाऱ्या भूत वर जाऊन लसीकरण करून घ्यावे.असे आवाहन डॉ. मांडगे यांनी केले आहे.