बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी...
![बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_64360b6f14cd1.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : भास्कर बोंद्रे
बुलढाणा : संग्रामपूर येथे महात्मा फुले प्रतिष्ठानच्यावतीने, क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष हरिभाऊजी राजनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. व त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षण आणि त्यांनी केलेल्या कार्याबाबत माहिती मिलिंद सोनोने सर यांनी दिली. सोबतच श्री. उमाकांत शिरसोले सर यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना फुले दाम्पत्यांना ज्या संकटाचा सामना करावा लागला त्याबद्दल विस्तृत माहिती दिली.
तर राहुल शिरसोले यांनी महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील रूढी परंपरा व अनिष्ठ चालीरिती, अंधश्रद्धा ह्या बहुजन समाजावर कश्याप्रकारे लादल्या गेल्या व त्यातून त्या अनिष्ठ चालीरितीला वाचा फोडण्यासाठी महात्मा फुले "ब्राह्मणाचे कसब " या पुस्तकातुन अनेकविध दाखले दिले याबाबत मार्गदर्शन केलें. कार्यक्रमाला आनंदराव राजनकर, काशिनाथ सावतकर, उद्धवराव व्यवहारे, प्रा. निशिगंध सातव, प्रा.सुधीर मानकर सर, गणेश वानखडे, तुषार सातव, सुनील राजनकर, प्रशांत गोसावी, पुरुषोत्तम मिटकरी, नगर परिषद गटनेता अफसर कुरेशी व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.