साकोली नगरपरिषद अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत.! विकासाला दिशा कधी मिळणार?

साकोली नगरपरिषद अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत.! विकासाला दिशा कधी मिळणार?

NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके

साकोली : ब्रिटिशकालीन असलेली साकोली नगरपरिषद अजूनही, विकासाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. डिसेंबर २०१६ ला साकोलीत शेंदुरवाफा हे गाव समाविष्ट करून, नगरपरिषद अस्तित्वात आली. पाच वर्षाच्या काळात विविध विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला. मात्र शहरातील पायाभूत समस्या "जैसे थे"  असल्याने, शहराच्या विकासाला दिशा कधी मिळणार? असा सवाल आता साकोली येथील सुज्ञ नागरिक करू लागले आहेत.

२०१६ ला स्थापन झालेल्या साकोली शेंदुरवाफा ग्रामपंचायतीचे नगरपरिषद रुपांतर झाले. जेव्हापासून नगरपरिषद अस्तित्वात आली तेव्हापासून; आजपर्यंत शहरातील मुख्य आठवडी बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांसाठी साधे ओटे नाहीत. सार्वजनिक शौचालय नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेला जाहीरनाम्यातून विकासाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी विकास कामात तिलांजली दिली. प्रत्येक प्रमाणात दिवाबत्ती, रस्ते, बैठक व्यवस्था, स्मार्ट शहर करू अशी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. पाच वर्षात आलेल्या निधीतून एकही विकास साध्य करता आला नाही. मग आलेला विकास निधी गेला कुठे? दुसरीकडे शहरातील अति गरजू व गरीब नागरिक घरकुल पासून वंचित आहेत मग घरकुल दिले कोणाला? असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे.