दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने वृक्षारोपण...
![दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने वृक्षारोपण...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66968be818db5.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरात दिंडोरी नगरपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वृक्षारोपण अभियान आज मंगळवार दि.१६ रोजी ग्रीन सिटी येथे राबविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ना वापरू फटाके,ना होईल प्रदूषण,वृक्ष लागवड व संवर्धन करा सौरऊर्जेचा वापर करा,प्लास्टिकचा वापर टाळा, हरित सण साजरे करा पाण्याचा पुनर्वापर करा,कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीत द्या, छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा,दिव्यांचा वापर करा, बाबत आवाहन दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांनी केले आहे. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी विजय देवरे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.