अहमदपूर नगरपालिकेत घनकचरा गोळा करण्यासाठी नव्याने ६ घंटागाड्या कार्यान्वित...
![अहमदपूर नगरपालिकेत घनकचरा गोळा करण्यासाठी नव्याने ६ घंटागाड्या कार्यान्वित...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_65814cc58ae97.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर शहरातील तयार होणारा घनकचरा गोळा करण्यासाठी नव्याने सहा घंटागाड्या खरेदी केल्या असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते १८ डिसेंबर रोजी नगर परिषद परिसरात विधीवत पूजा करून त्या घंटागाड्या कार्यान्वित करण्यात आल्या.
अहमदपूर नगर परिषदेकडे जुन्या आठ घंटागाड्या असून घनकचरा गोळा करण्यासाठी त्या कमी पडत होत्या. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नव्याने सहा नवीन घंटागाड्या खरेदी केल्या असून आत्ता एकूण १४ घंटागाड्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डासाठी एक घंटागाडी उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक ठिकाणी घंटागाडी उपलब्ध होणार असून शहरातील घनकचरा वाहून नेण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरात जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून तो रस्त्यावर इतरत्र न टाकता तो घंटागाडीतच टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केली आहे. या प्रसंगी नगर परिषदेतील कार्यालयीन अधीक्षक विठ्ठल भंडे, नगररचनाकार अजय कस्तुरे, लेखापाल राहुल येलगटे, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, शेख मुसा, साहेबराव शेवाळे, हबीब मुसा, सुनील सोनकांबळे, सतीश ससाणे, धनराज कांबळे, राहुल चव्हाण, धम्मानंद ढवळे, जिलानी शेख, यासह नगर परिषदेचे अनेक कर्मचारी आदींची उपस्थिती होती.