एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येची केस फास्ट्रेक कोर्टात चालवून, नराधम आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी...

एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येची केस फास्ट्रेक कोर्टात चालवून, नराधम आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा ( लातूर )

कर्नाटकातील हुबळी येथे दोन दिवसांपूर्वी येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा हिरेमठ ही आपल्या शैक्षणिक एमबीए ही पदवीची परीक्षा देऊन घरी येत असताना नराधम संशयित आरोपी फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला करत तिचे जीवन संपवले. नराधामास फाशीची शिक्षा व्हावी  त्यासंदर्भान उपजिन्ल्हाधिकारी यांना  24 एप्रील निवेदन देण्यात आले आहे .

नेहा हिरेमठ ही कन्या एक जंगम समाजातील सुसंस्कारी व शांत, हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. संशयित आरोपी फैय्याज हा तिच्या वर्गात शिकत होता. तो सतत तिच्या मागावर असायचा. अश्लील हावभाव करायचा यासंदर्भात तिने तिच्या घरच्यांना फैय्याज बद्दल तक्रार केली होती. त्याला घरच्यांनी अनेक वेळा समजावून सांगितले होते. पण या नराधमाने ऐकले नाही. नेहा तिच्या मनाविरुद्ध वागत आहे, असे लक्षात आल्याने त्याने नेहाचा काटा काढण्याचा डाव आखून नेहा वर चाकूने जोरदार वार करून तिचे जीवन संपवले.

ही केस फास्ट्रेक कोर्टात चालवून सदरील या नराधम आरोपी फैय्याज यास फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन जंगम संघटना व लिंगायत संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.  सदरील घटनेचा निषेध करत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पाठिंबा देत निवेदन दिले असून यावेळी जंगम समाज व लिंगायत समाज बांधव तसेच छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.