दिंडोरी शहरासह ग्रामीण भागातही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात...

दिंडोरी शहरासह ग्रामीण भागातही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

बोलो सिया रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय असा जयजयकार करत पौर्णिमेनिमित्त दिंडोरी शहरासह ग्रामीण भागातही श्रीराम भक्त महाबली हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पहाटे पासूनच भाविकांनी मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती.याशिवाय तालुक्यातील अनेक मंदिरांवर विद्युत रोषणाई मंदिरांमध्ये करून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. याशिवाय शेंदूर लेपन पुरोहित यांच्याकडून भाविकांनी केला होता हनुमान चालीसा पठण,भजन, करून त्यानंतर सूर्योदय होताच श्री हनुमानाची महापूजा व आरती व शंख नाद करून भाविकांनी बजरंगबली की जयघोष करू परिसर दुमदुमून टाकला करून सायंकाळी मिरवणूक व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती.