वलखेड येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
![वलखेड येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d87f676c7b1.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे सुतार लोहार संघटनेच्या मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्याच्या वतीने सुतार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा भगवान यांची जयंती सालाबाद प्रमाणे मोठ्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ८ वा. श्री विश्वकर्मा भगवान यांच्याच प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सत्यनारायण पूजा सौ.प्रिया राजगुरु व वैभव राजगुरु यांनी सपत्नीक केली.आरती नारायण राजगुरु व सौ.अवंतिका राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आली.१० वा. विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची गावभर मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ११ ते १ वाजता ह.भ.प.निवृत्ती महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. त्यांनी प्रमोधन करताना सांगितले की भगवान विश्वकर्मा हे सर्व समाजाचे दैवत आहे त्यांनी वेगवेगळ्या अवतार घेऊन त्यांची नेत्रदीपक कामगिरी सर्वांनी आत्मसात करावी स्पर्धेच्या या युगामध्ये अनेक कला लोपपावत चालल्या असल्या तरी आजच्या तरुणांनी वेगवेगळ्या माध्यमातून कला जोपासल्या पाहिजे असे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते शिंदे महाराजांचा सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसाद होऊन महिलांसाठी हळद-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला ह.भ.प.कविता पगार यांनी हळदी कुंकवाचे महत्त्व सांगून उपस्थित महिलांना वान देण्यात आले. समाजातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या प्रथम,द्वितीय,तृतीय, आलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करून त्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. मालेगाव येथील सेवा ब्लड बँकच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. शिबिरामध्ये डॉ.पुष्पक पगार प्रीतीस पवार,रवींद्र चव्हाण,सचिन पिंगळे,परिश्रम घेतले.
तालुक्यातील संघटनेच्यावतीने समाज बांधवांचे शासनाच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या विश्वकर्मा योजनांचे मोफत फॉर्म भरून घेण्यात आले. नाशिक येथील कपिलेश्वर मंदिराच्या ट्रस्टीच्या अध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची निवड झाल्याने तसेच गावातील उपस्थित असलेल्या मान्यवरांचाही समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळणारे येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकर्मा जयंतीचे नारळ घेतल्याने त्यांचाही संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तालुक्यातील ग्रामस्थ,महिला,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिरसाठ यांनी केले तर आभार उमेश आहेर यांनी मानले.