निवडणूक अधिकारी शिंदे यांनी दिले; गुरुजींना निवडणूक कामाचे धडे...

निवडणूक अधिकारी शिंदे यांनी दिले; गुरुजींना निवडणूक कामाचे धडे...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 साठी  नियुक्त 2710 मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामाचे धडे निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिले.

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे निवडणूक प्रशिक्षण दिंडोरी येथे दोन सत्रामध्ये संस्कृती लॉन्स येथे दिंडोरी येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गामध्ये साहित्य स्वीकृती व वितरण केंद्रावरून मतदान साहित्य स्वीकारल्यापासून परत मतदान साहित्य जमा करण्यापर्यंत, मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी करावयाच्या विविध टप्प्यावरील विषयांचे सखोल पीपीटी सादरीकरण द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गामध्ये ईव्हीएम मशीन हाताळणी बाबत लाईव्ह प्रात्यक्षिक पडद्यावर दाखवण्यात आले व दोन्ही सत्रांमध्ये संबंधित नियुक्त निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांना evm hands on प्रशिक्षण ५० च्या गटाने मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत देण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गामध्ये  विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने समाविष्ट असणाऱ्या गोष्टींवर विशेष भर देऊन सदर विषयाबद्दल सविस्तर सूचना,निर्देश देण्यात आले.प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी निवडणूक प्रशिक्षण साहित्य ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणा वर्गामध्ये मॉक पोल कशा पद्धतीने करायचा याचे प्रात्यक्षिक पडद्यावर दाखवण्यात आले. मतदानसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका,इलेक्शन ड्युटी प्रमाणपत्रा बाबत सविस्तर सूचना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे अर्ज

स्वीकारण्याबाबत स्वतंत्र कक्ष तयार  करण्यात आला होता.निवडणूक मतदान अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी मतदान केंद्रावरील मतदार यादीतील नाव ऑनलाइन क्रमांक पाहण्यासाठी स्वतंत्र दहा ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. 

यावेळी प्रशिक्षण वर्गास दिंडोरी चे तहसीलदार तथा साहाय्यक निवडणूक अधिकारी मुकेश कांबळे, पेठ तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती आशा गांगुर्डे आदींसह अधिकारी,  सर्व सेक्टर अधिकारी,सर्व नोडल अधिकारी,सर्व पथक प्रमुख,सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते.

चौकट///

जे अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षणास गैरहजर होते त्याना कारणे दाखवा नोटीस बजावणीतून खुलासा मागवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.