थोरात विद्यालयात चित्रकला मेहंदी रांगोळीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
थोरात विद्यालयात रांगोळी,मेहंदी चित्रकला स्पर्धा व रॅली आदींच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हान दिंडोरी पेठ मविप्र.संचालक प्रवीण नाना जाधव यांनी यावेळी केले.विद्यालयात सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
विद्यालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने चित्रकला,रांगोळी,निबंध,मेहंदी,घोषवाक्य आदीं स्पर्धांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहेत.सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासंदर्भात शपथ विद्यालयाकडून देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ गडाख,प्रदीप जाधव,सोनाली खरात कांचनमाला हुजरे,धनंजय जाधव, कृष्णा जाधव,हेमराज गांगोडे,दिलीप पागेरे,व राम ढगे यांनी स्पर्धा व विविध उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.