चाकण-तळेगाव चौकात अवैध वाहतुकीचा उच्छाद, वाहतूक विभागाची बघ्याची भूमिका...!

चाकण-तळेगाव चौकात अवैध वाहतुकीचा उच्छाद, वाहतूक विभागाची बघ्याची भूमिका...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सध्या चाकण शहर व परिसरात मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्यात चाकण-तळेगाव चौकात अवैध वाहतुकीने अक्षरशः उच्छाद माजवला आहे. पण या उच्छादाकडे चाकण वाहतूक विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.

चाकण-तळेगाव चौकात अवैध रिक्षा, अवैध ओमिनी यांनी अक्षरशः कुणाची भीड नं बाळगता सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवैध वाहतूक करत असल्याचे दिसून येतं आहे. याकडे मात्र चाकण वाहतूक विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे. एवढेच नाही तर ऐन सायंकाळी वाहतूक कोंडीच्या वेळी चाकण वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक नियमन करायचे सोडून इतर गाड्या अडवून त्यातील ड्राइव्हर यांना काळ्या काचा केलेल्या चौकीत बोलावून घेऊन नक्की काय करतात? या बाबतही चाकणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.

अगदी चाकण-तळेगाव चौकात अवैध रिक्षा चालक अगदी चौकात आपल्या वाहतुकीचे नियम मोडून रिक्षा उभ्या करतात. तर काही रिक्षा वाले आपली रिक्षा भरावी यासाठी पॅसेंजर बरोबर हुज्जतहि घालताना दिसतात. मात्र यावर चाकण वाहतूक विभाग कर्मचारी व त्यांचे वरिष्ठ फक्त जसे काही झालेच नाही अशा अविर्भावात वावरताना दिसत आहेत. चाकण-तळेगाव चौक, माणिक चौक, आंबेठाण चौक या सर्व चौकात एकच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला किंवा वाहतुकीचे नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तींना याच वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका बसत आहे. कुणाला वेळेवर रुग्णालयात जाता येतं नाही, कुणाला वेळेवर कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाता येतं नाही तर कामगार,विद्यार्थी यांना वेळेवर पोहचता येतं नाही. यामुळे चाकण वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वाहतूक कोंडीवर व अवैध वाहतुकीवर चाकण वाहतूक विभाग अंकुश लावणार की, हात ओले होतात म्हणून फक्त बघ्याची भूमिका घेणार हेच पहावे लागेल.

प्रतिक्रिया :

चाकणच्या वाहतूक कोंडीमुळे काही दिवसांनी आम्हाला गुजरातला कामाला जावे लागेल अशीच भीती आमच्या मनात निर्माण झाली आहे. कंपनी कामगार, शाळेच्या बस, कंपनी ट्रान्सपोर्ट त्याचं बरोबर रुग्णवाहिका, सार्वजनिक कार्यक्रम यांना पोहचण्यासाठी तासो न तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपन्या व सर्वसामान्य यांचे नुकसान अन वेळ वाया जात आहे. याला राजकीय अनास्ता व वाहतूक प्रशासनचं जबादार आहे. चाकण वाहतूक प्रशासन वाहतूक नियमन करण्यापेक्षा स्वतःचे नियमन करत आहे असे म्हंटले तरी वावघे ठरायला नको.

- विशाल तापकीर, स्थानिक ग्रामस्थ