महावितरणचा अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान.! शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा...

महावितरणचा अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान.! शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा...

प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक 

दिंडोरी : आधीच आसमानी संकटांना तोंड देत देत शेतकरी कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहे त्यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शिवनई रस्त्याच्या शेतकऱ्यांना महावितरणच्या गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. 

शिवनई रोड लगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्र.४,१४ व २८ या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे. जवळजवळ एक ते दीड वर्षापासून शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही आणि जेवढा होतोय तोही ७०  ते ८० व्होल्टेज दाबाने अशा होल्टेजमध्ये घरातील फॅन व मिक्सर सुद्धा चालत नसल्याने शेतकरी शेती पिकाला पाणी कसे देणार ट्रांसफार्मरची सुद्धा दुरावस्था झाली असून जळालेल्या केबल्स साठी सुद्धा शेतकरी वर्ग लोक वर्गणी काढून बसवतात मात्र ट्रांसफार्मरचे फ्यूज, डीओ हे देखील शेतकऱ्यांना बदलावे लागतात वेळेवर महावितरणचे कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही. सदरील शेतकऱ्यांची शेती ही डीआरडीओच्या भिंतीलगत असल्याने तेथे नेहमी बिबट्याचा वावर असतो, रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे लागते. त्यात विजेचा लपंडाव इकडून तिकडून वीज सुरळीत चालू झाली की व्होल्टेजचा प्रॉब्लेम. महावितरणच्या अशा कारभारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून पुढील चार ते पाच दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्याला समोर सर्व शेतकरी मिळून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.

या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळणार की नाही,यांच्या समस्यांचे निवारण होणार की नाही, या समस्या त्वरित निवारण होणार की नाही की या शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवेदनात संपत तिडके,संतोष तिडके,शांताराम विधाते,सुरेश वाघ, शामराव खोडे,सुनील विधाते,दसरथ काळे,भगीरथ तिडके,भरत ठाकरे, भाऊसाहेब वाघ,उत्तम विधाते आदींच्या सह्या आहेत.