राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर दोघांची नियुक्ती...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर दोघांची नियुक्ती...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

मुंबई प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने; माजी मंत्री बाळासाहेब जाधव व अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिफ़ारसीवरुन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीस पदी येथील असलम मोहंम्मद शेख व एडवोकेट मुझम्मील हाशमी यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती पत्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटिल, मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.अनिल पाटिल, अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई नायकवडी व युवकचे प्रांत अध्यक्ष सूरज दादा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शेख अय्याज जहूर अहमद, माजी नगरसेवक जावेद  बागवान, शेख असलम व ग्रंथालय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद नबी  आदि उपस्थित होते. त्यांना या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.