कृषी विभागाच्यावतीने रानभाजी महोत्सव सोहळा संपन्न....

कृषी विभागाच्यावतीने रानभाजी महोत्सव सोहळा संपन्न....

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  सुधीर शिवणकर, सडक / अर्जुनी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी कार्यालय सडक - अर्जुनी यांच्यावतीने; दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी रानभाजी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अनेक प्रकारच्या रानभाज्या सोहळ्यात प्रदर्शनासाठी ठेवल्या आल्या होत्या.

या कार्यक्रमावेळी उद्घाटक म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे उपस्थित होते; तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती शालीदंर कापगते, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, डॉ. रुखीराम वाढई, तालुका कृषी अधिकारी कु. बडोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यात तालुक्यातील उमेदचे बचत गट आणि मावीमच्या गटानी भाग घेऊन स्पर्धेत  शेकडो रानभाज्यांच्या जातीचे स्टॉल लाऊन त्यांची माहिती दिली.