उदगीरची शासकिय दुध डेअरी पुर्णजिवत करणार - केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला
![उदगीरची शासकिय दुध डेअरी पुर्णजिवत करणार - केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b7d6cec6351.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातुर जिल्ह्यातील उदगीर येथील शासकिय दुग्ध डेअरी पुर्णजिवत करणार असल्याचे पुरुषोत्तम रूपाला केंद्रीय मंत्री पशुसंवर्धन व दुग्ध विकास यांनी व्यवसायिक, पशुपालक व शेतकरी संवाद कार्यमात बोलतांना मत व्यक्त केले आहे.
यामुळे परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जिवनात नविन आशा पल्लवीत झाल्या आहेत.लातूरचे खा. सुदाकर श्रंगारे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
उदगीर येथील शासकिय दुध भुकटी प्रकल्प पंरगाणात दि.२९/०१/२०२४, दुपारी १ वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला होता या प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धविकास केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला,खा.सुदाकर श्रंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, माजि आ.गोविंद केंद्रे,माजि आ.सुदाकर भालेराव, माजि जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,भाजपा जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी रितेश मते,मानिक लटपटे तसेच हजारो शेतकरी या कार्यक्रमात उपस्थित होते.