बदलत्या हवामानामुळे धान पिकावर रोगराईचे सावट...

बदलत्या हवामानामुळे धान पिकावर रोगराईचे सावट...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, साकोली

परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसापासून वातावरणात बदल होत असल्याने कोबडी धान पिकावर विविध रोगाने आक्रमण करून धानपिक फस्त केली आहे. त्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी विविध कंपनीची महागडी कीटकनाशक औषधी फवारणी करण्यात आली, मात्र रोगराई आटोक्यात येत नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

साकोली तालुक्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. याच व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वर्षभराच्या उदरनिर्वासह इतर देवाण-घेवाण याचा गाडा चालत असतो. तालुक्यात कोणतीही मोठे उद्योगधंदे नसल्याने दरवर्षी येणारा शेती व्यवसाय नाईलाजाने करावा लागत आहे. दरवर्षी निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी व्यवसायात लावलेली पुंजी निघत नसून डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे होत आहे. तर दुसरीकडे शेतीला आवश्यक असलेल्या साहित्याची अभावात मोठ्या प्रमाणात वाढ  आहे. त्या तुलनेत शासन शेतमालाला हमीभाव देत नाही. अशी द्विधावस्था निर्माण होत आहे. मात्र शेतकरी आशावादी आहे. आज ना उद्या निसर्ग सात दिल्या आशेवर शेती व्यवसाय करीत असतो. यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड करून सज्ज झाला आहे. त्या धान पिकांना खोत पाणी देऊन धान पीक वाडीकडे टकलावून बघत आहे. मात्र मागील काही दिवसापासून हवामान बदलामुळे लागवड केलेले कोवळीधान कीटकनाशक औषधांची दुबार तीबार फवारणी करण्यात आली. मात्र रोगराई आरोग्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. पुन्हा निसर्गाचे दुष्काळ काही दिवस असे सुरू राहिल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांची आशाची निराशा होऊन कर्जबाजारी होऊन चिंचेचे जीवन जगावे लागतील. असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन सवलतीच्या दरात कीटकनाशक औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.