निष्क्रिय मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची हकलपट्टी करा; नगराध्यक्षा उप नगराध्यक्षकांनी नगरपंचायतला ठोकले टाळे...

निष्क्रिय मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची हकलपट्टी करा; नगराध्यक्षा उप नगराध्यक्षकांनी नगरपंचायतला ठोकले टाळे...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, देवणी

लातूर : लातूर जिल्हातील देवणी  नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांचा देवणी येथील अतिरिक्त पदभार तात्काळ कमी करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे नगरपंचायतीस टाळे ठोकून  आंदोलन केले.

नगरपचायतीला टाळे टाकुन केले आदोलन  जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांना नगराध्यक्षा डॉ. कीर्ती घोरपडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.जिल्हा सह आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याधिकारी गजानन शिंदे हे मागील दीड वर्षापासून देवणी नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना नगरपंचायतीत पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी विकास कामे व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे शक्य होत नाही. सभागृह व त्यांच्यातही समन्वय राखला जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. सर्वसामान्याचे व सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे व विकास कामे व्हावेत याकरिता शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सभागृहात त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला. यासंबंधीचा अर्ज सह आयुक्तांकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे. आजतागायत त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा सोमवार ४ मार्च रोजी नगरपंचायतीस टाळे ठोकण्यात आले दखल नाही घेतल्यास  बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्षा डॉ. किर्ती घोरपडे यांनी जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांना एका निवेदनाद्वारे दिला होता सबंधित लोकप्रतिधीच्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली त्यामुळे नगराध्यक्षा किर्ती ताई घोरपडे , उपनगराध्यक्ष अमित मानकरी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रवीण बेळे नगरसेविका वंदना बंडगर , सत्यभामा घोलपे, भाग्यलक्ष्मी मालभागे ,प्रा डॉ अनिल इंगोले अदि उपस्थित होते .