रस्ता दुरुस्त न केल्यास रामराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा...

रस्ता दुरुस्त न केल्यास रामराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे फाटा ते अक्राळे फाटा रस्ता दुरुस्त न झाल्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  रामराव पाटील चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.    

नाशिक - कळवण या राज्य महामार्गावर पिंपळणारे फाटा ते अक्राळे फाटा या ७ किमीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ठिकठिकाणी अपघात होत आहेत.याबाबत बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष द्यावे याबाबत,तळेगांव दिंडोरी येथे ग्रामस्थांची नुकतीच बैठक झाली त्यामध्ये येथील ग्रामस्थांनी रस्त्याबाबत नाराजी व्यक केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिक कळवण हा रस्ता चौपदरी करणं करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. परंतु रस्ता राज्य महामार्गातून राष्ट्रीय महामार्ग म्हणून वर्ग झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते अक्राळे फाटा हा रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले होते. अर्धा रस्ता साईड पट्ट्यासह बनवला  आहे.परंतु उर्वरित रस्ता शासनाचा निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदार काम करण्यास नकार देत आहे. याबाबात रामराव पाटील चौधरी यांनी संबंधित ठेकेदार यांच्याशी संपर्क केला असता; मला मंजूर असलेला निधी मिळत नसल्याने मी काम पूर्ण  करू शकत नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी ही संपर्क साधला असता त्यांनीही कामे मंजूर असून लवकर सुरू होतील असे सांगितले जात आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने विविध अपघात होत आहे. रामराव पाटील चौधरी यांच्या चिरंजीवचाही अपघात या रस्त्यावर झाल्याने लाखो रुपये खर्च करावे लागले व कायमचे अपंगत्व पत्करावे लागले आहे. मोठया प्रमाणात शारीरिक आजार यामुळे वाढत असल्याने नागरिक, शेतकरी यांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आठ दिवसाच्या आत खडे न भरल्यास रस्ता रोको करण्यात येईल व पूर्ण रस्ता व्यवस्थित न केल्यास बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ नेते रामराव पाटील चौधरी, दिंडोरी शेतकरी संघाचे संचालक संतोष कथार व ग्रामस्थ यांनी दिली.