छगन भुजबळाचे ऐकून सरकारला भोगांव लागेल.! हिंगोलीतील सभेतून जरांगे पाटलांचा इशारा...

छगन भुजबळाचे ऐकून सरकारला भोगांव लागेल.! हिंगोलीतील सभेतून जरांगे पाटलांचा इशारा...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित; आज (दि.०६ जुलै) हिंगोली येथे जनजागृती शांतता रँली संपन्न झाली. या रॅलीत मराठ्यांचा महासागर यावेळी दिसून आला.

तर मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत सरकारवर जोरदार प्रहार केला.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ यांचे ऐकून सरकारला भोगांव लागेल.! सरसकट मराठ्याना कुणबी दाखले द्या ही आमची मागणी आहे. आमच्या नोंदी असून देखील; आम्हाला आरक्षण दिले जात नाही. ज्यांच्या नोंदी नसून त्यांना आरक्षण आणि आमच्या नोंदी असूनही आरक्षण नाही. हा कोणता न्याय... असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते हिंगोलीती गांधी चौकात मराठा समाजबांधवांना संवाद साधत होते.

जर सरकारने आरक्षण नाही दिलेतर; १३ तारखेचा निर्णय हा तुम्हाला झेपावणार नाही. बहुतेक सरकार व आमची भेट ही मुंबईतच होणार सर्व ओबीसी नेते एक झाले असून, मराठ्यांना त्रास देत आहेत असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला.