लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर.!

लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर.!

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातुर शहर स्वच्छतेसाठी झाडू उचलत अजित पाटील कव्हेकर यांनी प्रशासनाकडे बोट दाखवत स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आज दि.९ स्पटेंबर सामवारी रोजी लातूर शहर स्वच्छतेला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ते 10 ट्रॅक्टर घेऊन शहराच्या विविध भागात गेले आणि ‘माझे लातूर माझी जबाबदारी’ असे सांगत त्यांनी शहराची स्वच्छता केली. कालचक्र शहरात गणरायाचे आगमन झाले असून अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे. कचऱ्याबाबत आपण वेळोवेळी आवाज उठवत असून महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहराची दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.