आदिवासी युवक कल्याण संघाचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा

आदिवासी युवक कल्याण संघाचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

शासकीय सेवेतील पदभरती मध्ये अनुसूचित जमातीतील एसटी संवर्गाच्या कोट्यातून निव्वळ झालेल्या कर्मचार्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे यासह अनेक मागण्यासाठी आज दि.५ सप्टेंबर रोजी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने  माजी आ.डॉ.संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला व आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदन देण्यात आले 

हा मोर्चा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातुन  शहरातील विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मूळ आदिवासी समाजाच्या मागण्या मध्ये बोगस लोकांनी आदिवासींची बळकावलेली १२ हजार ५०० अधिसंख्य पदे विशेष मोहिमेद्वारे तातडीने भरावीत, तसेच अनुषेशाची ५५ हजार ६८७ पदे तातडीने भरावीत, आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर बोगस जातीच्या लोकांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेउन संरक्षण द्यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील वर्ग एक ते तीन ची पदे भरतेवेळी पूर्व परीक्षेचा वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, संभाजीनगर येथे असलेले अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय ते कळमनुरी, कीनवट येथे स्थलांतरित करावे अशा विविध मागण्यासाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला.