हिट अँड रन या जाचक अटी रद्द करा.! उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ड्रायव्हरांचा मोर्चा...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार
यवतमाळ : हिट अँड रन या जाचक अटी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी; उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ड्रायव्हरांनी मोर्चा काढला आहे. उमरखेड येथील सर्व चालकांनी तीव्र विरोध केला असून, थोड्या वेळा करिता रस्ता रोको करण्यात आला होता.
त्यामुळे काही काळ उमरखेड शहरातील चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले होते. शहरातील सर्व चालकांनी आंबेडकर चौक या ठिकाणावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देऊन, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी सर्वांना सहकार्य करून निवेदन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.