शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लाखांदूर तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा...

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लाखांदूर तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिके नष्ट झाले. अनेक कुटुंब बेघर होऊन उध्वस्त झाले. परंतु महाराष्ट्रात असलेले आंधळे-बहिरे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही असं म्हणत; दि.१६ ऑगस्ट रोजी लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे शेतकऱ्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी लाखांदूर तहसिल कार्यालयावर भव्य पायदळ हल्लाबोल मोर्चात सहभाग घेत मोर्चा काढला. 

यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी १७ किलोमीटर पायी चालून, सरकारच्या विरोधात आपला रोष दर्शवत तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले.

या मोर्चात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, सभापती मदन रामटेके यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.