मोहाडी गोपालकृष्ण देवराईचे कार्य प्रशंसनिय - अभिनेते सयाजी शिंदे

मोहाडी गोपालकृष्ण देवराईचे कार्य प्रशंसनिय - अभिनेते सयाजी शिंदे

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी  येथील सह्याद्री गोपालकृष्ण देवराईने ग्रामस्थांच्यामदतीने गेल्या चार वर्षात वृक्षारोपण,जनजागृती व संवर्धन  विषयी केलेले काम त्यातील सातत्य व केलेली प्रगती प्रशंसनिय असून मोहाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनीही घेऊन पर्यावरणाच्या या कामात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. सयाजी शिंदे मोहाडी देवराईने वृक्ष संवर्धनाविषयी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमानिमित्ताने 'चला हवा येऊ द्या' फेम लेखक अरविंद जगताप यांच्यासह मोहाडी देवराई भेटी प्रसंगी केले. 

सकाळी सयाजी शिंदे यांनी के.आर.टी.हायस्कूल मोहाडीच्या विद्यार्थी व ग्रामस्थांसह गावातून वृक्षदिंडी व वृक्षसंवर्धना संदर्भातील कामाबद्दल आभार फेरी काढली. त्यानंतर के.आर.टी.हायस्कूल येथे 'चला सावली पेरूया' या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात वृक्षारोपण जनजागृती संबंधी विद्यार्थ्यांशी संवाद साधून  पुढील वर्षीच्या वृक्षारोपणासाठी विविध वृक्षांच्या बियांसह ३००० पिशव्या शाळेकडे सुपूर्त केल्या.याप्रसंगी वृक्ष संबंधित रांगोळी स्पर्धा, गीतगायन व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. दुपारी सह्याद्री देवराई येथे सह्याद्री देवराई साठी आपल्या सी.एस.आर.फंडातून भरीव मदत केल्याबद्दल लॉर्ड इंडिया नाशिक,महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्विसेस नाशिक,महिंद्रा अँड महिंद्रा होम फायनान्स, सह्याद्री फार्म्स मोहाडी यांच्या प्रतिनिधींचा सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर देवराईतील सोलर पंप,पाणी टाकी,सह्याद्री देवराई कमान तसेच महाराष्ट्र सह्याद्री देवराई कडून ७० हजार रुपये किमतीच्या ३० प्रकारच्या यापूर्वी मोहाडी देवराईत नसणाऱ्या ५०० दुर्मिळ झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी देवराईच्या कामाविषयी ग्रामस्थांचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता अभिनेते सयाजी शिंदे सह सर्वांनी वृक्ष संदर्भातील गीतगायन व सामूहिक नृत्याने केली. 

याप्रसंगी मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे,सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे,महाराष्ट्र देवराईचे खजिनदार सचिन चंदने,संगीत दिग्दर्शक शैलेंद्र निसर्गगंध,चित्रकार केशव कासार, छायाचित्रकार जे.पी.वृक्षमित्र शेखर गायकवाड,वास्तु विशारद सतीश पवार,गायक प्रतीक सोळसे,कवी प्रकाश होळकर,मविप्र संचालक प्रवीण जाधव,कादवा संचालक शहाजी सोमवंशी, प्रा.विलास देशमुख,पुंडलिक कळमकर,सरपंच आशा लहांगे उपसरपंच भाग्यश्री जाधव, मुख्याध्यापक रामनाथ गडाख,राजेंद्र परदेशीसह ग्रामस्थ केटीएचएम कॉलेजचे विद्यार्थी व वृक्षप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.आर.टी.हायस्कूल शिक्षक,विद्यार्थी व मोहाडी गोपालकृष्ण देवराईच्या सदस्यांनी प्रयत्न केले.