दिंडोरी येथे वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे...

दिंडोरी येथे वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथे आज शनिवार दि.१७ रोजी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.

अनेक ठिकाणी झाडे लावली जातात परंतु त्याची त्या झाडांची निगा राखली जात नाही अशा झाडांची निगा राखली तर निसर्गाचे व पर्यावरणाचे रक्षण होईल असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नितीन बोराडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सानवी फलाने,आंचल पगारे, प्राची नाठे,अश्विनी गायकवाड, चांदणी गुप्ता,नीलम गवळी, अनुष्का घुगे, अंजली कोडीलकर,तेजस सातपुते,ईश्वरी सरोदे,सोनाली जाधव, वनिता कांबळे,गौरी आंबेकर,गौरी भिलोरे,अदितीया बोराडे, तन्वी जगताप, ईश्वरी पवार,दिव्या पताडे, नेहा वाघमारे,पूजा दास, साक्षी कराटे, आकांक्षा जगताप,आदिसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.