दिंडोरीत लोकसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण...
![दिंडोरीत लोकसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_664230026be81.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
२० दिंडोरी,(अ.ज.) लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १२२ दिंडोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघामध्ये द्वितीय प्रशिक्षण संस्कृती लॉन व मंगल कार्यालय दिंडोरी येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये देवळा,चांदवड, नांदगाव,निफाड,येवला,कळवण, सुरगाणा येथील १२०० मतदान अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी व दिंडोरी पेठ तालुक्यातील ४०० महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.सदर प्रशिक्षणास नियुक्त. ४४ क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये साहित्य वितरण व साहित्य स्वीकृती नियोजनाबाबत, अभिरुप मतदान कार्यपद्धती, मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर मतदान केंद्राच्या आतमध्ये करावयाच्या विविध निवडणूक प्रक्रियांबाबत सविस्तरपणे प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी व निवडणुकीच्या दिवशी सादर करावयाचे विविध अहवाल तसेच मशीन बंद पडल्यास करावयाच्या उपायोजना व त्या अनुषंगाने सादर करावयाचे विविध अहवाल याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले.मतदान यंत्राची वाहतूक करताना कशाप्रकारे काळजी घ्यायची प्रत्यक्ष मशीन कशाप्रकारे हाताळव्याचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गामध्ये पिंक मतदान केंद्र,दिव्यांग मतदान केंद्र,युवकद्वारे चालवण्यात येणारे मतदान केंद्र व परदानशी महिलांची ओळख पटवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याबाबत प्रशिक्षणामध्ये सांगितले.प्रशिक्षणा दरम्यान मतदान केंद्रावर वेब कास्टिंग सुविधा,सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती याबाबत सांगण्यात आले.मतदान अधिकारी/ कर्मचारी यांना मतदान केंद्रावर वेगवेगळ्या सुविधा बाबत तसेच अंगणवाडी सेविका,अशा वर्कर, स्वयंसेवक यांच्याशी योग्य तो समन्वय साधून मतदान प्रक्रिया सहज व सुलभ होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम मशीनचे मॉक पोल कसे करायचे याबाबत लाईव्ह स्क्रीनवर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. व त्यानंतर ५० च्या ग्रुप मध्ये अधिकारी कर्मचारी यांना क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत मॉक पोल बाबत हँडस ओन प्रशिक्षण देण्यात आले.सदर प्रशिक्षणाच्या दरम्यान जिल्हा बाहेरील व जिल्ह्यातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी २ सुविधा कक्षांची नियुक्ती करण्यात आली होती.
सदर सुविधा कक्षामध्ये १४५ इतक्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला.प्रशिक्षण च्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्राची रचना करण्यात आली होती. निवडणूक निरीक्षक यांनी आदर्श मतदान केंद्र,मतदान सुविधा केंद्र याची पाहणी करून एकूण प्रशिक्षण च्या ठिकाणी अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले.व निवडणुकीच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.