गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, तर नदी - नाले लागले ओसंडून वाहू...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांना दमदार पावसाची आशा होती. मात्र अद्याप पर्यंत पाऊस बरसलेला नव्हता. परंतु, काल सायंकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून, सर्व दूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
रात्रभर दमदार पाऊस बरसल्याने; नदी - नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर ग्रामीण भागतील अनेक नदी आणि नाल्याना पूर आले आहे. आलेल्या पाऊसामुळे मारबदचा उत्सव कमी पाहायला मिळत असला तर दमदार पाऊसाने बळीराजा मात्र सुखवाला आहे. दुसरीकडे धरणाच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.