कोटंबी घाटात अपघातस्थळांची अधिकारी वर्गाकडून पाहणी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : गेल्या कित्येक दिवसांपासून कौटुंबी घाटामध्ये वळणाच्या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी; या वळणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मैराळे, मृदुला नाईक, पेठ तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवरे यांच्यासह दिल्लीहून अधिकारी आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून, सावळघाट व कोटबी घाटातील अपघात उताराची पाहणी केली. वळणांची दुरुस्ती करावी याचा तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी विकास कृती समितीचे संयोजक यशवंत गावंडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.