दिंडोरी तालुक्यातील समस्यांबाबत मा. आमदार धनराज महाले यांचे तहसीलदारांना निवेदन...
NEWS15मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांनी माजी आमदार धनराज महाले यांच्याकडे अनेक समस्यांबाबत तक्रारी केल्या त्यानंतर; गुरुवार दि. ४ रोजी तहसील कार्यालय दिंडोरी येथे तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेऊन, निवेदन देण्यात आले. रेशनकार्ड धारकांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत जेणेकरून जीर्ण झालेले रेशनकार्ड, ऑनलाइन केलेले रेशनकार्ड, विभक्त कुटुंब नव्याने नाव टाकणे आशा अडचणी बाबत चर्चा केली या चर्चेनंतर तहसीलदार यांनी वेबसाइड दिली असून, https://rcmc.mahafood.gov.in याचा वापर करावा व काही समस्या असतील पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
तालुक्यात नळवाडपाडा येथे अत्यंत दुर्देवी घटना घडली होती. त्यात आजोबा व नातू यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्यावतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून धनराज महाले यांनी सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाले यांनी तात्काळ तहसीलदार व पालक मंत्री दादाजी भुसे यांना घटनेची माहिती देऊन स्वतःपालक मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पिढीत कुटुंबीयांना त्यानुसार तहसीलदार व त्यांच्या सरकारी यंत्रणेच्या सहकार्याने प्रत्येकी ४ लाख रुपये मदत मंजूर झाले असल्याची माहिती तहसीलदार यांनी बैठकी मध्ये दिली.
याशिवाय नाशिक दिंडोरी व वणी या रस्त्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्र उत्सव हा येत आहे. तरी त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ वाढणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होणं अपेक्षित आहे. मात्र तातपुरता स्वरूपात का होईना हे खड्डे भुजवण्यात यावे व शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामार्फत नवीन झालेले मंजूर रस्ते व डागडुगीचे रस्ते तात्काळ काम सुरू करावे यासाठी निवेदन देण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या ३ ते ४ दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. यावेळी नागरिकांनी माजी आमदार धनराज महाले यांचे आभार मानले. या प्रसंगी संपर्क प्रमुख सुनिल पाटील, सहकार नेते सुरेश डोखळे, तालुकाप्रमुख अमोल कदम, वैभव महाले, कैलास गामने, सागर पवार, सरपंच दीपक चौधरी, सुरज राऊत, तुषार गांगोडे, बाळू भोये, रमेश गायकवाड आदींसह लाभार्थी उपस्थित होते.