मोहाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाची सांगता...

मोहाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाची सांगता...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दरवर्षीप्रमाणे येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त गेले सात दिवस पहाटे काकडा आरती,दुपारी मकरंद जोशी यांचे भागवत वाचन, श्रीरामरक्षा स्तोत्र, शांतिपाठ,हरिपाठ आदी कार्यक्रमांसह रात्री नऊ ते साडेअकरादरम्यान कैलासबुवा खरे (रत्नागिरी ) यांचे कीर्तन झाले.  

सोमवारी (२६) रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला.राधिका कुलकर्णी यांनी श्रीकृष्ण जन्माचा पाळणा पाळण्याचे गायन केले.आरती होऊन प्रसादवाटप करण्यात आला. मंगळवारी (ता.२७ ) सकाळी दहाला तेजस जोशी,रेणुका जोशी यांनी सपत्नीक श्रीकृष्ण मूर्तीला जलाभिषेक केला.सतीश कुलकर्णी, सागर जाखडी व प्रसाद जोशी यांनी पौरोहित्य केले.देवाला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखविला.महाआरती होऊन प्रसादवाटप झाला.रात्रीआ ९ वा.ह. भ.प.कैलासबुवा खरे यांच्या कल्याच्या कीर्तनाने श्रीकृष्ण जन्मोत्सवाची सांगता झाली.

यावेळी कीर्तनात तबल्याची साथ किरण लिंगायत,मृदंग साथ पंकज जाधव तर हार्मोनियमची साथ विनायक प्रभूघाटे यांनी केली. देवस्थान ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार झाला.संजय डिंगोरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे उत्तम जाधव,जयंत जोशीमुकुंद पाटील,संपतराव देशमुख, पंढरीनाथ कळमकर,प्रवीण डिंगोरे, राजेंद्र जाधव,कमलाकर कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.