महात्मा फुले महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
![महात्मा फुले महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65ce18f2ed4dd.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
क्रांतीसिंह सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक -धार्मिक क्षेत्रातील बुध्दीप्रामाण्यवादी चिंतनशील समाज सुधारक होते असे प्रतिपादन अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि १५ फेब्रुवारी २०२४ रोजी उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण यांनी आयोजीत कार्यक्रमात केले तत्पूर्वी उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण यांच्या शुभहस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श सेमी इंग्लीश स्कूल चे प्राचार्य डॉ. संतोष पवार होते यावेळी मनोगत व्यक्त करताना पुढे डॉ.चव्हाण म्हणाले की, संत सेवालाल महाराज समाज सुधारक होते त्यानी दिलेली शिकवण स्त्रियांचा सन्मान करा, पाणी आणि जगंल आणि पर्यावरणाचे रक्षक करा, सन्मानाने जगा अशी होती सद्यस्थितीत समाजाला मार्गदर्शक ठरते असे ही म्हणाले, त्यानंतर प्राचार्य डॉ. संतोष पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला यावेळी महाविद्यालयातील प्रा. संजय जगताप ,प्रा. डॉ. बळीराम पवार, प्रा. बालाजी आचार्य, प्रा. डॉ. अनंत सोमुसे, प्रा. डॉ. भारत भदाडे, प्रा. डॉ. विरनाथ हुमनावादे, प्रा. डॉ. दर्शना कानवटे, प्रा. पदमा हगदळे, प्रा. डॉ. अंबादास मुळे , प्रा. विठ्ठल कबिर , प्रा. बालाजी गुट्टे ,प्रा. दयानंद सुर्यवंशी , प्रा. अभय गोरटे , प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे ,कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे , उद्धवराव जाधव, इद्रदेव पवार, ज्ञानेश्वर खिडसे , उमेश जाधव, किशन धरणे, आखिल शेख, अनिल भदाडे, शिवाजी हुबाड आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञ संचालन प्रा. बालाजी आचार्य यानी केले तर शेवटी आभार प्रा. संजय जगताप यांनी मानले.