वीज वितरणचा अरविंद गव्हाणे नामक निवृत्त कर्मचाऱ्याला शासनाची पेन्शन असूनही उद्दातपणे स्वतःच्या पगारातून महिन्याला मानधन देणारा रामप्रसाद नरवडे नामक अधिकारी? खरच एवढा उदार अधिकारी आपण कधी पाहिला नसेल...!
![वीज वितरणचा अरविंद गव्हाणे नामक निवृत्त कर्मचाऱ्याला शासनाची पेन्शन असूनही उद्दातपणे स्वतःच्या पगारातून महिन्याला मानधन देणारा रामप्रसाद नरवडे नामक अधिकारी? खरच एवढा उदार अधिकारी आपण कधी पाहिला नसेल...!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63380601900d4.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील ग्रामस्थ वीज वितरण कंपनीने नेमलेल्या महिला वायरमन व तिचा सहकारी निवृत्त अरविंद गव्हाणे नामक व्यक्ती यांच्या विरोधात चाकण येथील वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन सादर करून या मुजोर महिला वायरमन व निवृत्त अरविंद गव्हाणे नामक व्यक्तीची गावातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
यावर आम्ही चाकण मधील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना या आपल्याकडूनच मागील दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या अरविंद गव्हाणे नामक व्यक्ती बद्दल विचारले असता त्यांनी असा कोणताही व्यक्ती आम्ही कामावर ठेवला नसल्याचे सांगितले. जर हा व्यक्ती वीज वितरण कंपनीने कामाला ठेवला नाही तर याला कामाला कुणी ठेवले आणि याचा पगार कोण करते? असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला.
यावर आम्ही हा वीज वितरण विभागातून मागील दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या अरविंद गव्हाणे नामक व्यक्तीला फोन करून तुम्हाला कुणी कामाला ठेवले? असा प्रश्न केला असता मला रामप्रसाद नरवडे साहेबांनी कामाला ठेवले आहे असे उत्तर मिळाले. तुमचा पगार कोण करते? तर अरविंद गव्हाणे व्यक्तीने माझा पगार रामप्रसाद नरवडे साहेब करता असे उत्तर दिले. बघा म्हणजे हे नरवडे साहेब किती दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आज पर्यंत आपण सर्वांनी ऐकले असेल ज्यांची कोटीच्या घरात संपत्ती आहे असे लोक पैशाचे दान धर्म करतात तेही खूप वेळा विचार करून. पण, हा वीज वितरण कंपनीचा दानशूर आणि आत्ताच्या महागाईच्या काळात स्वतःचे कुटुंब सांभाळून या निवृत्त व्यक्तीला स्वतःच्या पगारातून मानधन अदा करतो म्हणजे या रामप्रसाद नरवडे अधिकारी यांचा जाहीर सत्कार करायला हवा. हा अधिकारी एवढ्यावरच थांबला नाही तर मी या निवृत्त व्यक्तीस स्वतःच्या पगारातून मानधन देतो असे मी लिहून देण्यास तुम्हाला तयार आहे असेही हा दानशूर वीज वितरणचा अधिकारी रामप्रसाद नरवडे बोलले आहेत. अशा जनतेची मांनगूटी पिळून दानशूर अधिकारी समाजात कमीच भेटतील असेही म्हंटले तरी वावघे ठरणार नाही.
विशेष करून हा वीज वितरण कंपनीचा रामप्रसाद नरवडे नामक अधिकारी चुकीचे रिपोर्ट देऊन पैशाची मागणी करत असल्याचीही तक्रार खराबवाडी गावातील ग्रामस्थ करत आहेत. एवढेच नाही तर रामप्रसाद नरवडे यांनी कशी पैशाच्या लालसे पोटी चुकीच्या रिपोर्टवर सही केली आहे याचेही पुरावे News15 मराठीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे स्वतःला सावजी म्हणून घेणाऱ्या या नरवडे नामक अधिकारी याने तो निवृत्त अरविंद गव्हाणे नामक व्यक्ती व ती अमृता चौधरी नामक वायरमन फक्त वसुली अधिकारी म्हणून ठेवले होते का? असा प्रश्न खराबवाडी ग्रामस्थांना पडला आहे.
चाकण वीज वितरण विभागात मोठ्या प्रमाणावर अराजक्ता माजली आहे यासाठी वायरमन अमृता चौधरी, दानशूर अधिकारी रामप्रसाद नरवडे व तो वसुली अधिकारी निवृत्त कर्मचारी अरविंद गव्हाणे यांच्यावर आता चाकण वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? असा खडा सवाल खराबवाडी गावचे ग्रामस्थ विचारत आहेत.
गावातील धाडगे वस्तीवरील रोहीत्र चार वेळा जळाले आहे. या संदर्भात वस्तीवरील ग्रामस्थांनी अनेक वेळा आमचे रोहीत्राची कॅपिसिटी वाढून देण्याची मागणी केली होती. पण त्यावर अजून कोणताही सकारात्मक विचार वीज वितरण कंपनीकडून करण्यात आला नाही. त्यामुळे रोहीत्र जळाल्याचा मोठा मनस्थाप धाडगे वस्तीवरील नागरिकांना सोसावा लागत आहे. याकडे हे मुजोर रामप्रसाद नरवडे व वायरमन अमृता चौधरी साफ दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वरिष्ठाकडे पाठवली आहे. यावर वरिष्ठ काय कारवाई करताय हेच पहावे लागेल.