जिल्हाध्यक्ष मा. आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात; काँग्रेसचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांच्या भेटीला...
प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया
सडक अर्जुनी तहसील कार्यालयासमोर केसलवाडा ता. स/अर्जुनी, जि. गोंदिया येथील महिला भगिनींनी शासकीय गट क्र. 281 क्षेत्र 9.51 हे.आर. जमीनीपैकी दिलेला पट्टा रद्द होईपर्यंत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
याची माहिती सडक अर्जुनी तालुका कमिटी काँग्रेस यांना माहिती होताच; जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांना भेटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मधुसुदन दोनोडे, जिल्हापाध्यक्ष रोशन बडोले, दिनेश हुकरे, सेवादल अध्यक्ष संतोष लाडे, स्वप्नील ब्राम्हणकर उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन माजी आमदार दिलीपभाऊ बन्सोड यांनी उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्याशी चर्चा करून, उपोशषणकर्त्यांची मागणी मान्य करावी म्हणून काँग्रेस शिष्टमंडळाने उचलून धरली तर उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे मान्य केले.